Rural Education Advancement Trust
Science Video Competition 2026
नमस्कार! Rural Education Advancement Trust (REAT) – रिट ही संस्था गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान (STEM) या विषयांत गती मिळावी ह्या उद्देशाने विविध उपक्रम राबवते. आमचा “फिरती प्रयोगशाळा” उपक्रम महाराष्ट्रातल्या ६०+ शाळेतल्या ८००० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या उर्जेतून गेल्या वर्षी आम्ही सुरू केलेल्या विज्ञान व्हिडिओ स्पर्धेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. तोच उपक्रम आम्ही यावर्षीही घेऊन येत आहोत.
या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्या YouTube चॅनेलचा कसा उपयोग होईल याची माहिती खाली देत आहोत.
स्पर्धेचे उद्दिष्ट
केवळ प्रयोगशाळेच्याहि पुढे जाऊन विद्यार्थ्यांना विज्ञान विषयांत गोडी वाढावी, म्हणून “घरगुती प्रयोगातून विज्ञान” असे ह्या स्पर्धेचे उद्दिष्ट असेल.
नियम आणि अटी
* नियम व अटी समजून घेण्यासाठी हा विडिओ बघा https://youtu.be/bS3fOFoagcs
* हि स्पर्धा इयत्ता दहावी किंवा त्याखालच्या इयत्तांमधल्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
* प्रत्येक व्हिडिओ मराठीमध्ये असावा आणि त्यात किमान एक विज्ञानविषयक शिकवण असणे आवश्यक आहे.
* विद्यार्थी स्पर्धकांनी REAT ने दिलेल्या sample व्हिडिओचा (https://youtu.be/z8fgA2Hk-kI) उदाहरण म्हणून वापर करून आपला पूर्णपणे स्वत:च्या संकल्पनेने तयार केलेला व्हिडिओ सादर करावा (पालकांनी फक्त रेकॉर्डिंग सहाय्य केले तर चालेल, पण प्रत्यक्ष प्रयोग करू नये.)
* प्रयोग साहित्य शक्यतो घरगुती किंवा खेड्यांमध्येही सहज उपलब्ध होईल, असे असावे.
* धोकादायक प्रयोग टाळावेत.
* व्हिडीओ जास्तीत जास्त ५ मिनिटांचा (किंवा त्यापेक्षा कमी) असावा.
* प्रत्येक विद्यार्थी एकच व्हिडीओ पाठवू शकतो.
* प्रयोग संकल्पना मूळची (ओरिजिनल) असावी. दुसरीकडचे व्हिडीओ कॉपी करून प्रस्तुत करू नयेत.
अंतिम तारीख
आपल्या व्हिडीओची यूट्यूब लिंक ३१ डिसेंबर २०२५ च्या संध्याकाळी ६ वाजण्यापूर्वी आमच्या गूगल फॉर्म द्वारे आम्हाला पोहोचणे आवश्यक आहे.
फॉर्मची लिंक Click Here for the Form.
विजेत्यांची निवड
* निवडक व्हिडीओ REAT च्या channel वर प्रदर्शित करुन त्यावर पब्लिक वोटिंग (Likes) आणि तसेच त्याशिवाय REAT ने नेमलेल्या परिक्षकांचे मतदान होईल. YouTube Likes शिवाय परिक्षक इतर निकषांवरुनहि मतदान करतील. त्यांचा निर्णय अंतिम असेल.
* सर्व स्पर्धकांना REAT चे YouTube channel subscribe करणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी आपल्या सर्व मतदाराना channel subscribe करण्याचा आग्रह धरावा.
पारितोषिके
* प्रथम क्रमांक: रु. २०००/- च्या किमतीचे गिफ्ट हॅम्पर
* द्वितीय क्रमांक: रू. १५००/- च्या किमतीचे गिफ्ट हॅम्पर
* तृतीय क्रमांक: रू. १०००/- च्या किमतीचे गिफ्ट हॅम्पर
* या शिवाय आणखी काही उत्तेजनार्थ बक्षिसे
चला तर शालेय विद्यार्थी मित्रांनो,
त्वरा करा आणि मोठ्या संख्येने सामील व्हा!
Current Status
of the Lab On Wheels Project
